जळगाव,
दि. 16 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 करीता जळगाव जिल्ह्यातील चोपडा,
रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा,
जामनेर, मुक्ताईनगर या विधानसभा मतदार संघाकरीता
क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत.
फौजदारी
प्रक्रिया संहिता, 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या
शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी
यांनी विधानसभा निवडणूक-2019 च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले विधानसभा मतदार
संघाचे क्षेत्रीय अधिकारी यांना दि. 19 ऑक्टोबर, 2019 च्या सकाळी 6.00 वाजेपासून
ते 21 ऑक्टोबर, 2019 या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित
केले आहे. त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 129, 133, 143 व 144
अन्वये शक्ती प्रदान केल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश
ढाकणे यांनी काढले आहे.
0000
No comments:
Post a Comment