जळगाव, दि. 19 - विधानसभा निवडणूकीचे
मतदान करण्यासाठी मतदारांना कोणतीही अडचण येवू नये. याकीरता जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी
प्रयत्न करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व मतदारांना मतदार चिठ्ठया
पोहोचविण्यात आल्या आहेत. तथापि, अद्याप ज्या मतदारांना मतदार चिठ्ठया मिळाल्या
नसतील त्यांचेसाठी जळगाव शहर मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रासमोर रविवार,
दि. 20 ऑक्टोबर व सोमवार, दि. 21 ऑक्टोबर, 2019 रोजी बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) हे
थांबणार आहेत. अशी माहिती जळगाव शहर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय
अधिकारी श्रीमती दिपमाला चौरे यांनी दिली आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की,
ज्या मतदारांना आपले नांव व मतदान केंद्र क्रमांक मतदार यादीत बघावयाचे असल्यास
त्यांच्यासाठी मतदार यादी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्यांना
मतदान चिठ्ठी मिळाली नसेल ते सुद्धा संबंधित बीएलओ यांचेकडून मतदार चिठ्ठी प्राप्त
करुन घेवु शकणार आहे.
तसेच दिव्यांग व अति वयोवृद्ध मतदार
ज्यांना हालचाल करता येत नाही किंवा अर्धांगवायु आहे. अशा मतदारांसाठी 10 व्हील
चेअर व 11 वाहनांची व्यवस्था करण्यात अलेली असुन ज्या मतदारांना मदत हवी आहे
त्यांनी श्री. फिरोज पठाण, मोबाईल नंबर- 9096770128 आणि श्री. सरोदे मोबाईल नंबर-
7276262220 यांच्याशी संपर्क साधावा. असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 13-जळगाव
शहर मतदार संघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment