जळगाव,
दि. 19 - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चे मतदान सोमवार, दिनांक 21 ऑक्टोबर तर
मतमोजणी गुरूवार, दि. 24 ऑक्टोंबर, 2019 रोजी होत आहे. जिल्ह्यात यादिवशी भरणारे
आठवडे बाजार मतदानाचा व मतमोजणीचे दिवस सोडून इतर सोईच्या दिवशी भरविण्यात येणार
आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पारित केले होता.
चोपडा
विधानसभा मतदार संघाचे निवडणूक साहित्य रविवार, दिनांक 20 ऑक्टोबर, 2019 रोजी
मतदान केंद्रनिहाय वितरीत होणार असल्याने चोपडा शहरामध्ये भरणारा आठवडे बाजार व
गुरांचा बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्याचे आदेशही जिल्हादंडाधिकारी डॉ. ढाकणे
यांनी पारीत केले आहे.
000
No comments:
Post a Comment