याप्रसंगी चोपडा व रावेरचे निवडणूक निरिक्षक नरेंद्रसिंग पटेल, भूसावळ व जळगाव शहरचे रुपक मुजूमदार, जळगाव ग्रामीण व अमळनेरचे पुनीत गोयल, एरंडोल व चाळीसगावचे पार्थ सारथी मिश्रा, पाचोरा, जामनेर व मुक्ताईनगरचे निवडणूक निरिक्षक गौरव बोथरा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती अधिकारी श्रीमती शैलजा पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समिती (MCMC) चे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी निवडणूक निरीक्षकांना मिडीया कक्षामार्फत सुरु असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी निवडणूक निरिक्षकांनी निवडणूक कालावधीत वर्तमानपत्रातील जाहिराती, पेडन्यूज, सोशल मिडीया, आकाशवाणी, एफएम, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयावरील जाहिरात तसेच स्थानिक केबलवरुन प्रसारीत होणाऱ्या बातम्या व जाहिरातीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्यात. तसेच माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय उमेदवार जाहिरात प्रसारण करीत असल्यास त्यांचेवर तातडीने कार्यवाही करुन संबंधितांना नोटीस देण्याचेही त्यांनी सांगितले. माध्यमांमध्ये पेडन्युज विशेषत: सोशल मिडीयावरील प्रचारावर विशेष लक्ष ठेवावे. त्याचबरोबर विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मिडीया कक्षामार्फतही स्थानिक वर्तमानपत्र व चॅनेलवर बारकाईन लक्ष ठेवून त्याचा दैनंदिन अहवाल जिल्हास्तरीय मिडीया कक्षास पाठविण्याच्या सुचना निवडणूक निरिक्षकांनी केल्या. पेडन्यूजबाबतची माहिती निवडणूक खर्च शाखेस द्यावी. समितीकडे प्राप्त होणारे प्रचार साहित्य बारकाईने तपासून योग्य प्रचार साहित्य विहित वेळेत प्रमाणित करुन देण्याच्या सुचनांबरोबरच मिडीया कक्षात सुरु असलेले कामकाज बघून निवडणूक निरिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित महाराष्ट्र राज्याची सर्वांगीण माहिती असलेले मॅग्नीफिशंट महाराष्ट्र या पुस्तकाची प्रत देऊन सर्व निवडणूक निरिक्षकांचे स्वागत केले.
000
No comments:
Post a Comment