Friday, 4 October 2019

मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढण्यासाठी जिल्ह्याचे आयकॉन नियुक्त

         जळगाव, दि. 4- विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदानाचा आपला हक्क बजवावा, दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा, त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य  आहे याची जाणीव व्हावी, याकरीता मतदारांमध्ये व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील चार प्रमुख व्यक्तींची जिल्ह्याचे आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
     यामध्ये श्री. मुकुंद गोसावी, अध्यक्ष, मुक्ती फाउंडेशन, जळगाव, श्री. अल्ताफ शेख, अभिनेता, अहिराणी भाषा (खान्देश भाषा) मु.पो. धार, ता. एरंडोल, श्रीमती मिनाक्षीताई निकम, अध्यक्ष, स्वयंदिप फाऊंडेशन, चाळीसगाव यांच्याबरोबरच पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेत्या श्रीमती निलीमा  मिश्रा यांची जिल्ह्याचे ऑयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे.
     निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकांमध्ये मतदारांचा व विशेषत: दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा याकरीता समाजातील प्रतिष्ठित दिव्यांग व्यक्तींना District Campus Ambassador  अथवा इतर मान्यवर व्यक्तींना District Icon म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तीं म्हणून त्यांची जिल्ह्याचे District Icon म्हणून नियुक्ती केली आहे.
     या व्यक्तींनी मतदारांमध्ये व समाजातील दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणेसाठी व त्यांना मुलभूत सुविधा उपलब्घ करुन देणेकामी District Icon म्हणून निवडणूक विभागास सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
                                                                          000

No comments:

Post a Comment