Tuesday, 1 October 2019

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



            जळगाव, दि. 2 - राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
            जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा सुचना व‍ विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कुळकायदा तहसीलदार शरद मंडलीक, सामान्य प्रशासन तहसीलदार माणिक आहेर, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, संजय गांधी योजना तहसीलदार श्री. दळवी, जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment