जळगाव, दि. 1 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 करीता
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर,
एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर,
मुक्ताईनगर या विधानसभा मतदार संघासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी
यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
फौजदारी
प्रक्रिया संहिता, 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या
शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी
यांनी विधानसभा निवडणूक-2019 च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले स्थायी निगरानी पथक,
फिरते पथकाच्या प्रमुखांना तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दि. 21
सप्टेंबर, 2019 ते 27 ऑक्टोबर, 2019 या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी
म्हणून घोषित केले असून त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 129, 133,
143 व 144 अन्वये शक्ती प्रदान केल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.
अविनाश ढाकणे यांनी काढले आहे.
000
No comments:
Post a Comment