जळगाव,
दि. 15 - माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती येथील
जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे,
उपजिल्हाधिकारी महसूल रविंद्र भारदे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिपक चव्हाण तहसिलदार
प्रशांत कुलकर्णी, तहसिलदार सुभाष दळवी, तहसिलदार संदीप आहेर यांच्यासह अधिकारी,
कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही
डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000
No comments:
Post a Comment