Saturday, 5 October 2019

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन


            जळगाव, दि. 5:- जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या कल्याणविषयक विविध बाबींचे तसेच पेन्शन व इतर अडीअडचणी सोडविण्यासाठी नोव्हेंबर, 2019 मध्ये माजी सैनिक मेळावा आयोजित करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती वामन कदम, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव यांनी दिली आहे.
            जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांनी आपल्याला असलेल्या अडीअडचणी लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे ऑक्टोबरअखेर पर्यंत द्याव्यात. तसेच स्टेशन हेडक्वार्टर,  भुसावळ यांच्या मेळाव्यात ज्या इच्छूक माजीसैनिक व  त्यांचे अवलंबितांना उपस्थित रहावयाचे आहे. त्यांनी सुध्दा आपली नोंदणी करावी, असे आवाहन श्री. कदम, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment