जळगाव,
दि. 27 (जिमाका) - जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या
पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार फेब्रुवारी
महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 3 फेब्रुवारी, 2020 रोजी आयोजित करण्यात आला
आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही
दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरून
कोणतेही उत्तर मिळाले नसेल, असेच वैयक्तिक हितसंबंधाबाबत तक्रारी घेऊन विहित नमुन्यातील
अर्जासह दुपारी 3.00 वाजेपर्यंत नियोजन
भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे लोकशाही दिनी उपस्थित रहावे. अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे लोकशाही दिनात सादर करु नयेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वामन
कदम यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment