जळगाव.दि.30 :- देशाच्या
स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त
करण्यासाठी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानुसार आज
दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठिक 11.00 वाजता
हुतात्मांच्या स्मरार्थ आदर व्यक्त करण्यासाठी
भोंगा वाजवून दोन मिनिटांसाठी मौन (स्तब्धता) पाळण्यात आले.
याप्रसंगी अपर
जिल्हाधिकारी नरेंद्र बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी
महसूल रविंद्र भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा
अधिकारी सुनिल सुर्यवंशी, निवडणूक नायब तहसिलदार सुनिल समदाणे, सहाय्यक जिल्हा
पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी आदि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment