Monday, 6 January 2020

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा


            जळगाव, दि. 6 - येथील जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहण्यात आली.
            यावेळी ज्येष्ट पत्रकार विजय पाठक, दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक दिनेश दगडकर, दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, दैनिक नजरकैदचे संपादक प्रवीण सपकाळे, दैनिक यावल समाचार चे प्रमोद वाणी, पत्रकार सुनील भोळे, जयवंत भोईटे, दीपक सपकाळे, नारायण पवार, चेतन निबोळकर यांच्यासह विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीं, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
                                                                            0000

No comments:

Post a Comment