Saturday, 4 January 2020

ग्रामपंचायत निवडणूकीमुळे आठवडे बाजाराच्या दिवसात बदल -जिल्हादंडाधिकारी डॉ. ढाकणे


            जळगाव, दि. 4 - जिल्ह्यातील मुळ ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता 9 जानेवारी, 2020 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील करगाव, चैतन्य तांडा क्रमांक-4, इच्छापूर तांडा क्रमांक-2, अमळनेर तालुक्यातील रणाईचे बु., रणाईचे खु. आणि धरणगाव तालुक्यातील एकलग्न व पोखरी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. 
            मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. याकरीता मतदान होणाऱ्या या गावांचा आठवडे बाजार गुरूवार, दि 9 जानेवारी यादिवशी न भरविता इतर सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी  जारी केले आहे.
                                                                       0000

No comments:

Post a Comment