जळगाव.दि.29- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागांतर्गत कार्यरत असलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या संस्थांना
“
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार ” या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहे.या पुरस्कारांतर्गत अनु.जातीच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे,निवासीशाळा/आश्रमशाळा
अनुदानित वसतिगृहे यांना देण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार राज्यस्तर तीन व विभागस्तरावर
तीन अशाप्रकारे 06 प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार असून राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये
प्रथम पुरस्कार रु.5 लाख ( रुपये पाच लाख
) , व्दितीय पुरस्कार रु.3 लाख ( रुपये तीन लाख ) तृतीय पुरस्कार रु.2 लाख ( रुपये
दोन लाख ) अशा प्रकारे असून विभागीयस्तर अनु.जातीच्या मुला-मुलींसाठी शासकी वसतिगृहे,
निवासी शाळा/आश्रमशाळा अनुदानित वसतिगृहे अशा प्रकारे दिले जाणार आहेत.
महसुली विभागातून गुणवत्तेच्या आधारे अनुसूचित
जातीच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे एकूण 06,अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी
निवासी शाळा /आश्रमशाळा 06,तर अनुसूचित जाती मुला-मुलींची अनुदानित वसतिगृहे 06 अशाप्रकारे
राज्यस्तरीय 03 आणि विभागस्तरीय 18 अशा एकूण
21 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ,जळगाव
योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment