जळगाव, दि.16 (जिमाका) - जिल्ह्यातील सर्व
तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येते. त्यानुसार जानेवारी महिन्याचा तालुकास्तरीय लोकशाही दिन सोमवार,
दि 20 जानेवारी रोजी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
तालुकास्तरीय लोकशाही दिनात जास्तीत जास्त
नागरिकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त
तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचित करून दर महिन्याला आयोजित तालुकास्तरीय लोकशाही
दिनास उपस्थित राहण्याच्या सुचना द्याव्यात, तसेच नागरीकांनीही त्यांच्या काही
अडीअडचणी असतील तर त्या या लोकशाही दिनात सादर कराव्यात. असे निवासी
उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment