जळगाव,
दि. 17 (जिमाका) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७०
व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे
पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
यांच्या उपस्थितीत २६ जानेवारी, २०२० रोजी सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. यावेळी होणाऱ्या संचलनात
राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान, स्वच्छ
भारत अभियान, आरोग्य सेवांसह इतर विभागांच्या विविध शासकीय योजनांवर आधारित
चित्ररथ सामील करावे. तसेच शहरातील शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे
आयोजन करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या.
प्रजासत्ताक
दिन समारंभाची पूर्वतयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जिल्हाधिकारी डॉ.
ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले,
निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जळगावच्या उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे,
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहायक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा
क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी,
जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार वैशाली हिंगे, माणिक आहेर, पोलीस
निरिक्षक दिलीप पाटील, यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, शिक्षण,
एनसीसी, कामगार व इतर विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रजासत्ताक
दिनाचा समारंभ नीटनेटका होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपल्यावर सोपविण्यात
आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे
यांनी बैठकीत दिल्या.
0000
No comments:
Post a Comment