Thursday, 30 January 2020

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायमंत्री सुनिल केदार जिल्हा दौऱ्यावर


        जळगाव.दि.31- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे..
गुरूवार दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी 12140 अप सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेसने रात्री 8.57 वाजता जळगावकडे रवाना.
शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी सकाळी 04.20 वा. जळगाव रेल्वेस्टेशन येथे आगमन व विश्रामगृह गांधीतीर्थकडे रवाना. सकाळी 10.00 वाजता गांधीतीर्थ संग्रालयास भेट. दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 2.00 वा. अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे सेवाग्राम विकास आढावा संदर्भात बैठक. दुपारी 4.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाची आढावा बैठक. दुपारी 5.00 वा. अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे क्रीडा विभागाची बैठक. सायंकाळी 6.00 वा. अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक. रात्री 9.15 वा. जळगाव येथून 12810 अप हावडा मेलने मुंबईकडे प्रयाण.
                                                    000000

No comments:

Post a Comment