जळगाव, दिनांक 17 : महाराष्ट्र शासन, सामान्य
प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रकानुसार तालुका स्तरावर प्रत्येक
महिन्याच्या तिस-या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याबाबत सुचित केले आहे.
त्याअनुषंगाने तिस-या सोमवारी म्हणजेच दिनांक 20 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिलदार जळगाव यांच्या
अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, जळगाव येथे तालुका स्तरावरील लोकशाही दिन आयोजित
करण्यात आला आहे. तरी सर्व संबंधितांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनाचा लाभ
घ्यावा, असे आवाहन जळगावच्या तहसिलदार श्रीमती वैशाली हिंगे यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये केलेले आहे.
00000
No comments:
Post a Comment