जळगाव,
दि. 16 (जिमाका) - राज्याचे पाणीपुरवठा व
स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शुक्रवार, दि. 17
जानेवारी, 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे..
शुक्रवार,
दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 8.45 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.20
वाजता जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता शासनाच्या जलसंपदा विभागाच्या एकलव्य
क्रिडा संकुल, एम. जे. कॉलेज परिसर, जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा, कला व
सांस्कृतीक कार्यक्रम उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता नशिराबाद येथील
कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी
3.40 वाजता जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव
येथे अभ्यांगताच्या भेटी. सायंकाळी 5.00 वाजता कलादर्पण 2019-2020 श्री. मनोज
पाटील इंटरनॅशनल इंग्लीश स्कुल यांचे स्नेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी
6.00 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
0000
No comments:
Post a Comment