Saturday, 4 January 2020

अवैध वाळूसाठ्याचा टाकरखेडा येथे 6 जानेवारी रोजी लिलाव


            जळगाव, दि. 4 - एरंडोलचे उपविभागीय अधिकारी श्री. विनय गोसावी यांच्यासह टाकरखेडा, धारागीर, ताडे येथील तलाठी यांच्या पथकाने मौजे टाकरखेडा येथे गिरणा नदी व परिसर गट नं. 1 मध्ये अवैध गौणखनिज तपासणी दौरा केला असता जैन रोपवाटीकासमोर मारोती मंदीर (जुने) जवळ, जुने गावठाण गट नं. 1 मध्ये अवैध अंदाजे 30 ब्रास वाळुचा साठा आढळून आला आहे.
            या अवैध वाळु साठ्याचा लिलाव जैन रोपवाटीकासमोर, मारोती मंदीर (जुने) जवळ जूने गावठाण गट नं. 1 या ठिकाणी सोमवार, दिनांक 6 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता ठेवण्यात आलेला आहे. यासाठी श्री. एस. पी. शिरसाठ, नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, एरंडोल यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. असे उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग, एरंडोल, जि.जळगाव श्री. विनय गोसावी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment