Wednesday, 15 January 2020

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवान पदाकरीता शुक्रवारी लेखी परिक्षा


जळगाव, दि. 15 (जिमाका) - अधीक्षक, राज्य उत्पादन विभाग, जळगाव यांचे कार्यालयात अनुसूचित जमाती प्रवर्गातील 1 (एक) जवानाच्या पदाकरीता लेखी परिक्षा शुक्रवार, दि. 17 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत अभिनव सराव शाळा, (गुळवे विद्यालय, जळगाव) जिल्हापेठ, ला. ना. शाळेच्या बाजूला या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
या केंद्रावर 29 उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. परिक्षार्थिना परीक्षेच्या आवश्यक साहित्याखेरीज मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर व अभ्यासाचे कोणत्याही प्रकारचे साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही. जवान परिक्षेसाठी प्रविष्ठ परिक्षार्थिनी परिक्षा केंद्रावर सकाळी 10.00 वाजेपूर्वी उपस्थित राहणे आवश्यक आहे. असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

No comments:

Post a Comment