जळगाव, दि. 6 -
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 7 जानेवारी, 2020 च्या
अधिसुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सन 2020 या
कॅलेंडर वर्षासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जळगाव
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन विभाग वगळून) तीन सुट्ट्या
जाहिर केल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील शासकीय
कार्यालयांसाठी आषाढी एकादशी निमित्ताने बुधवार,
1 जुलै, 2020 रोजी रक्षाबंधना निमित्ताने
सोमवार, दि. 3 ऑगस्ट, 2020 तर धनत्रयोदशी निमित्ताने शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर,
2020 रोजी याप्रमाणे एकूण तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.
तरी सर्व शासकीय आस्थापनांनी याची नोद घ्यावी,
असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment