जळगाव.
दि. 4 - दरवर्षीप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
करण्यात आले आहे.
प्रश्नमंजूषा
स्पर्धा आयोजनाचे ठिकाण, कालावधी, विजयी स्पर्धकांना मिळणारे पारितोषिकाची माहिती
पुढीलप्रमाणे. स्थळ:-एस.एम.जोशी महाविद्यालय, पुणे, कालावधी-16 ते 18 जानेवारी,
2020, पारितोषिके-अनुक्रमे 10 हजार, 9 हजार, 8 हजार, 7 हजार, 6 हजार अशाप्रकारे
आहेत. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा. कालावधी-22 ते 24
जानेवारी, 2020 असून पारितोषिके अनुक्रमे रूपये 15 हजार, 10 हजार, 5 हजार तसेच
सन्मानार्थ रूपये 3 हजार अशाप्रकारे आहेत.
अधिक
माहिती शिक्षण संस्थेच्या www.erayat.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. असे रयत
शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्राचार्य आर. के. शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment