जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.21- शाहपूर पोलीस स्टेशन, जिल्हा बैतुल मध्यप्रदेश येथे रहिम खां वल्द हसन खां, रा रसलपूर ता रावेर जि जळगाव यांचे विरुध्द गुरनं 122/2020 अन्वये मध्यप्रदेश गौवंश वध प्रतिषेध अधिनियम 2004 चे नियम 4,6 व 9 अंतर्गत गुन्हा दाखल असून सदरच्या गुन्ह्यात पिकअप वाहन क्रमांक एमएच-04-एफजे-8851 जप्त करण्यात आलेले असून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बैतुल मध्यप्रदेश यांचे न्यायालयात दिनांक 11 जुलै, 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता उपस्थित राहण्याबाबत व उपस्थित न राहिल्यास एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल. याबाबत पोलीस अधिक्षक बैतुल मध्यप्रदेश यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
तरी
रहीम खां वल्द हसन खां, रा रसलपूर ता. रावेर जि. जळगाव यांचे विरुध्द शाहपूर पोलीस
स्टेशन, जिल्हा बैतुल, मध्यप्रदेश येथे गौवंश वध प्रतिषेध अधिनियम 2004 चे नियम
4,6 व 9 अंतर्गत गुरंन 122/ 2020 अन्वये गुन्हा दाखल असून सदरच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले पिकअप वाहन क्रमांक
एमएच-04-एफजे-8851 बाबत खुलासा सादर
करण्याकामी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बैतुल, मध्यप्रदेश यांचे न्यायालयात
दिनांक 11 जुलै, 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता उपस्थित रहावे, व उपस्थित न
राहिल्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बैतुल, मध्यप्रदेश यांचेमार्फत
एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी जळगाव अभिजीत राऊत यांनी
एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment