जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.21- सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय परवाना प्राधिकारचे शुल्क व संयुक्त शुल्क रु. 16500/- भरण्याकरीता अर्जदारास वारंवार कार्यालयात यावे लागते. त्यामुळे सदरची कार्यपध्दत ही ऑनलाईन करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने
www.parivahan.gov.in संकेतस्थळावरुन अर्जदार
प्राधिकारपत्राकरीता शुल्क रुपये 1000/-
भरल्यानंतर ते स्वयंचलित पध्दतीने मान्यता देण्यात येवून रुपये 16500/- संयुक्त शुल्क
भरण्याकरीता दुरध्वनीवर संदेश पाठविण्यात येईल व त्यांच्यामार्फत ते
कार्यालयामध्ये न येता ऑनलाईन पध्दतीने भरणा करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्जदारस
प्राधिकारपत्राची स्वत:च्या संगणकावर प्रत काढणे शक्य असून, सर्व नोंदणी
प्राधिकरणांनी ई-स्वाक्षरी केलेली प्राधिकारपत्र ग्राहय धरण्यात येईल. तरी या
कार्यपध्दतीचा सर्व नागरीकांनी तसेच वाहतूकदार संघटनांनी लाभ घ्यावा, असे उप
प्रभारी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी सुनिल गुरव यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment