जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.27- जळगाव जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्यांच्या वेळे बाबत अनुज्ञप्त्यांची चालु/बंद करण्याची वेळ व तसेच पार्सल सुविधा/ टेकअवे/ होम डिलीव्हरी पध्दतीने याबाबत निर्बंध लागु करण्यात आलेले होते.
मात्र
आता शासनाने महसुल विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 31 मार्च, 2022 रोजीच्या
आदेशान्वये लॉकडाऊन बाबतचे यापुर्वीचे सर्व निर्बध दिनांक 1 एप्रिल, 2022 पासुन
मागे घेतलेले आहेत. तसेच कोविड – 19 च्या पार्श्वभूमिवर एक विशेष बाब म्हणून,
नमुना एफएल-2, एफएल/बिआर-2 एफएल/ डब्ल्यु-2 या अनुज्ञप्त्यांना घरपोच मदयविक्रीस
दिलेली परवानगी तसेच, एफएल-3, नमुना-ई व नमुना-ई 2 या अनुज्ञप्त्यांना अनुज्ञप्त्यांतीच्या
ठिकाणी सिलबंद मदयविक्री आणि घरपोच मदयविक्रीस दिलेली परवानगी आपोआप संपुष्टात
आलेली आहे.
तरी
कोव्हीड-19 मुळे अबकारी अनुज्ञप्तीबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयानुसार
लागु करण्यात आलेले सर्व (अनुज्ञप्त्यांच्या वेळे बाबत अनुज्ञप्त्यांची चालु / बंद
करण्याची वेळ तसेच पार्सल सुविधा / टेकअवे/ होम डिलीव्हरी पध्दतीने) याबाबतचे सर्व
निर्बध (महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभाग यांचे कडील दिनांक
31 मार्च, 2022 नुसार मागे घेण्यात येत आहे.
तसेच
जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारक यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी
सदरील अनुज्ञप्त्यांचे व्यवहार शासनाने विहित केलेल्या वेळेनुसार (अनुज्ञप्ती बंद करणे व सुरु करणे) या बाबत
दक्षत घ्यावी. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment