जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 2- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) जळगाव द्वारा आयोजित अनुसूचित जाती(SC) प्रवर्गातील युवक-युवतीं करिता 1 महिना कालावधीचा निःशुल्क (अनिवासी) उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बार्टीद्वारा स्थापित अनु. जातीचा स्वयं सहाय्यता युवा गटातील सदस्यांचा एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळावा संपन्न...
दि. 1 जून 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे,पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र( MCED) जळगाव द्वारा आयोजित, बार्टी द्वारा स्थापित अनुसूचित जातीतील स्वयंसहाय्यता युवा गटासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत- उद्योजकता परिचय मेळावा जिल्हा उद्योग केंद्र सभागृह, जळगाव येथे संपन्न झाला. सदरील कार्यक्रमाची सुरुवात; छत्रपती शिवाजी महाराज-महात्मा फुले-राजर्षी शाहू महाराज-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.चेतन पाटील सर(महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव), कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.आर.आर. डोंगरे सर (व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव), कार्यक्रमाचे पाहुणे श्री.आर.एस.चव्हाण सर (व्यवस्थापक खादी ग्रामोद्योग मंडळ, जळगाव), प्रमुख वक्ते श्री. डॉ.रागीब अहमद सर (मानसशास्त्रज्ञ व उद्योजक प्रशिक्षक, जळगाव), प्रमुख पाहुणे श्री. महेंद्र पाटील सर (तालुका समन्वयक व प्रतिनिधी सहा.आयुक्त समाज कल्याण विभाग), श्री. अनिल पगारे सर (तालुका समन्वयक व प्रतिनिधी सहा.आयुक्त समाज कल्याण विभाग), कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री. विनोद तुपे सर (प्रकल्प अधिकारी, MCED जळगाव), कार्यक्रमाचे प्रमुख श्री. युनुस तडवी सर, कार्यक्रमाचे आयोजक श्री.दिनेश गवळे सर (जिल्हा कार्यक्रम आयोजक MCED जळगाव) उपस्थित होते. प्रशिक्षण परिचय मेळाव्याचे प्रास्ताविक श्री.युनुस तडवी (जिल्हा प्रकल्प अधिकारी बार्टी) यांनी बार्टीचे विविध विभागा मार्फत चालविले जाणारे उपक्रम व विविध उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले तसेच युवा गटाच्या सदस्यांना सदर प्रशिक्षणाचे महत्व व आवश्यकता लक्षात आणून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण श्री. चेतन पाटील सर व श्री. डोंगरे सर यांनी केले तद्नंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. रागीब अहमद यांनी उपस्थित लाभार्थ्यांना उद्योग व व्यवसाय बाबतीत सखोल मार्गदर्शन करित आत्मविश्वास निर्माण रण्याबद्दल चे व्याख्यान केले. तसेच मासीक प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा व लाभार्थ्यांना मिळणारे फायदे या विषयावर MCED चे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री. विनोद तुपे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. उद्योजकता विकास प्रशिक्षण परिचय मेळाव्याचे नावनोंदणी साठी उत्स्फूर्तपणे मिळाला आणि कार्यक्रमानंतर लगेचच लाभार्थी गटांची मुलाखत घेतली गेली, मुलाखती साठी नवउद्योजक तयार होण्यासाठी जास्तीत जास्त भर दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी; MCED चे कार्यक्रम आयोजक श्री. विजय सैंदाणे, श्रीमती रेखा निकुंभ, श्रीमती दिपाली मॅडम तसेच समतादूत श्री.अर्जून गायकवाड, श्री.नितिन भोई, श्री.अक्रम मुजावर, श्रीमती. स्नेहा बोरसे, श्रीमती. सरला गाढे, सविता चिमकर, जयश्री चौधरी, शिल्पा मालपूरे, अर्चना किरोते, कल्पना बेलसरे यांनी परिश्रम घेतले व या परिचय मेळाव्यास युवागटातील 70 लाभार्थी उपस्थित होते. सदरील प्रशिक्षणात लाभार्थ्यांची मुलाखती घेण्यात आल्या आणि निवड झालेल्या 30 उमेदवारांना दिनांक 06 जून, 2022 पासून प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गात येण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे असे, समतादूत प्रकल्प अधिकारी (अतिरिक्त), युनुस तडवी यांनी एका प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
०००००
No comments:
Post a Comment