जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 3- जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 100 ग्रामपंचायतीतील 114 रिक्त सदस्य पदाच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचेकडून पारंपारिक पध्दतीने प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून पोटनिवडणूकीसाठीची नामनिर्देशन व माघारीची प्रक्रीया पुर्ण झालेनंतर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 8 ग्रामपंचयातीमधील रिक्त सदस्य पदासाठी दिनांक 5 जून, 2022 रोजी मतदान होणार असल्यामुळे सदर दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून दिनांक 5 जून, 2022 या दिवशीचे आठवडे बाजार इतर सोईच्या दिवशी भरविण्याचे आदेश त्यांनी काढले आहे.
ग्रामपंचायत
पोटनिवडणूक – 2022 प्रत्यक्ष सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीचा तपशील
मतदान दिनांक 5 जून,2022 या मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार भरणार असलेल्या गावांची
/ भागाची यादी खालील प्रमाणे नमुद करण्यात आली आहे.
तालुका
/ ग्रामपंचातीचे आणि गावाचे नाव - भसावळ – साकरी, चाळीसगाव- जामडी प्र ब, जामनेर-
वडगांव बु., मुक्ताईनगर – कुर्हा, पाचोरा- खेडगाव, यावल- डांभुर्णी, राजोरे,
हिंगोणा या दिवशी भरणारे आठवडे बाजार इतर
दिवशी भरविण्यात यावेत, असेही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment