जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 23- सर्व माजी सैनिक / विधवांना कळविण्यात येते की, जळगाव मध्ये सैनिकी मुलांचे वसतिगृह मध्यवर्ती शिवाजी पुतळयाजवळील, जी.एस.मैदान, जळगाव येथे असून सदर वसतीगृहामध्ये एकूण 48 मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच सैनिकी मुलींचे वसतिगृह हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ, धुळे रोड, जळगाव येथे असून सदर वसतीगृहामध्ये सुध्दा एकूण 48 मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 202-23 या शेक्षणिक वर्षात जे माजी सैनिक / विधवा जळगाव शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे पाल्य जळगाव येथे उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पाल्यांना या वसतीगृहात प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या पाल्यांना अती अल्प दरात सैन्याच्या रँक प्रमाणे भोजनखर्च आकारले जाते व विधवांच्या पाल्यांना सदर वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेश जागा शिल्लक राहील्यास इतर नागरीक पाल्यांना नियमानुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी प्रवेश पुस्तीका / अर्ज वसतीगृह अधिक्षक / अधिक्षीका व कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. तरी इच्छुक माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधिक्षक/अधिक्षिका यांचेकडून प्रवेश पुस्तीका / अर्ज खरेदी करुन आपला अर्ज त्यांचेकडे दिनांक 5 जुलै,2022 पर्यंत सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी खालील नमुद दुरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा.
अशासकीय वसतीगृह अधिक्षक श्री. चंद्रकांत पाटील मो.
नं. 9067354658 व दुरध्वनी क्र. 0257-2233088
वसतीगृह अधिक्षीका श्रीमती अनिता पाटील मो. नं. 8788245282 किंवा
दूरध्वनी क्र. 0257-2241414 वर
संपर्क साधावा, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या
पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment