जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.22- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केलेली आहे.
विभागाचे नाव – पुणे - सुनावणी दिनांक 30
जून, 2022 रोजी व्हि.व्हि. आय. पी शासकीय
विश्रामगृह, पुणे येथे दुपारी 2.00 वाजता, सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या
जाती/जमातीचे नाव –1) सगर 2) कडिया 3) कुलवाडी 4) टकारी 5) लिंगायत रड्डी
अमरावती
विभाग– दिनांक 5 जुलै, 2022 रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह अमरावती
येथे सकाळी 11.00 वाजता, सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती/जमातीचे नाव –1) हलवाई
2) हलबा कोष्टी 3)अहिर गवळी, गवळी अहीर,
अहीर 4) गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु. कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा
कापेवार इ. 5) हडगर 6) तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करणेबाबत, 7) केवट समाजातील
तागवाले/ तागवाली
नाशिक
विभाग – दिनांक 15 जुलै, 2022 रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक येथे
सकाळी 11 वाजता - सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती/जमातीचे नाव – 1) काथार/ कंठहारवाणी, 2)कंसारा,
3)अत्तार जातीच तत्सम जात पटवे, पटवेगर, पटोदर, 4) बैरागी जातीच्या संदर्भात शासन निर्णयात
दुरुस्ती 5) चेवले गवळी दाभोळी, गवळी व लिंगायत गवळी 6) नावाडी
नाशिक
विभाग –
दिनांक 16 जुलै, 2022 रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक येथे सकाळी 11
वाजता – 7) वळंजूवाणी, कुंकारी वळांजूवाणी, वळुज बळुंज, शेटे, दलाल इ. 8) लाडशाखीय
वाणी 9) लाडवंजारी 10) रामगडिया सिख 11) कानडे/ कानडी इत्यादी, असे संशोधन अधिकारी महाराष्ट्र राज्य
मागासवर्ग आयोग पुणे मेघराज राजकुमार भाते यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
०००००
No comments:
Post a Comment