Thursday, 2 June 2022

यावल तालुक्यातील नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिज वाहतुक करणाऱ्या जप्त केलेल्या वाहनांचे 8 जून रोजी जाहीर लिलावाव्दारे विक्री

        जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 2-      यावल तालुक्यातील वाळु चोरी विरोधी पथकांनी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहे.

          या वाहनाचे मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नसल्यामुळे अशाप्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करण्यासाठी  दिनांक 8 जून, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय यावल येथे जप्त केलेल्या वाहनांचे लिलाव करण्यात येत आहे.

          तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती / संस्थांनी लिलावात भाग घ्यावा, लिलावातील अटी व शर्ती लिलावात असलेली वाहने, लिलावात हातची किंमत इ. बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार यावल यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार यावल यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

No comments:

Post a Comment