जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.27- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13+1 यामध्ये वेंकटगिरी करीता 2 जागाचा समावेश आहे.) च्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/ सोलापूर/ मुंबई/ औरंगाबाद यांचे मार्फत विहीत नमून्यात प्रवेश अर्ज दि. 10 जून, 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
त्यास केंद्र शासनाच्या सुधारीत
कार्यक्रमानुसार दिनांक 11 जुलै, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यांत आलेली आहे. त्या
अनुषंगाने इच्छूक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दिनांक 11 जुलै, 2022 पर्यंत प्रादेशिक
उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालय यांचेकडे सादर करावे, प्रवेश अर्जाचा नमुना व इतर
अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे
http.www.dirtexmah.gov.in वर
उपलब्ध आहेत. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योगयांचे
कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे आयुक्त वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य
भा.प्र.से श्रीमती शीतल तेली - उगले यांनी
एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment