जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 2- शासनाकडुन मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाण्याचे 6 पाकीटे आणि मे. अंकुर सिडस, नागपुर या कंपनीचे स्वदेशी -5 हे देशी कापुस वाणाचे बनावट बियाण्याचे 60 पाकीटे विक्री करणाऱ्या मे. श्री साई राम ॲग्रो एजन्सी, चिखली ता. मुक्ताईनगर चे संचालक श्री. प्रदिप शामराव पाटील व श्री. गोपाळ वामन जवरे यांचेवर मोहिम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव श्री विजय पवार यांनी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांचे मार्गदर्शनाने व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव श्रीराम तायडे, तालुका कृषि अधिकारी मुक्ताईनगर श्री अभिनव माळी, कृषि अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर श्री. सुनिल मोरे, यांच्या सहकार्याने सापळा रचुन एकुण रु. 56700/- किमतीचे 66 एचटीबीटी कापुस बियाणे पाकीटे व स्वदेशी -5 वाणाचे बनावट कापुस बियाणे दिनांक 1 जुन, 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आले आहे.
याबाबत श्री. प्रदिप शामराव पाटील व श्री. गोपाळ
वामन जवरे चिखली ता. मुक्ताईनगर यांचे विरुध्द सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे क्र.
193/2022 दिनांक 1 जुन, 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप
हंगाम 2022 मध्ये बनावट तसेच अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे, अवैधरीत्या व बिना
बिलाने खरेदी करु नये. तसेच या बियाण्यांची कोणत्याही परिस्थीतीत शेतकरी बांधवांनी
लागवड करु नये, अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या
कार्यालयाचा मोबाईल क्र. 08468909641 व दुरध्वनी क्र. 0257-2239054 वर माहिती दयावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी
ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment