जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.29- सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली व्दारा सन 2022-23 या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या 61 वी आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप ( सबज्युनिअर/ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा या खेळाच्या र्स्प्धाच्या आयोजनाचा कार्यक्रम क्रीडा व युवकसेवा संचालनालय, पुणे यांना प्राप्त झाला आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धा हया दिनांक 1 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित होणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.
1)
वयोगट – 14 वर्षाखालील मुले –(
सबज्युनिअर) जन्मतारीख – दिनांक 1
जानेवारी 2009 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा 2) 17 वर्षाखालील मुले/मुली
(ज्युनिअर) दिनांक 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
त्या
अंतर्गत जळगाव जिल्हास्तर व जळगाव मनपास्तर क्रीडा स्पर्धा कार्यक्रम खालील
तपशिलनुसार निश्चित करण्यात आलेला असून जे संघ / खेळाडु सुब्रतो मुखर्जी फुटबॉल
स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशा सर्व संघानी जिल्हास्तर / मनपास्तर
स्पर्धेपूर्वीच www.subrotocup.in या संकेत स्थळावर खेळाडू
तसेच संघाची नोदणी करणे अनिवार्य आहे.
जळगाव जिल्हास्तर व जळगाव मनपास्तर सुब्रतो
फुटबाफल क्रीडा स्पर्धा कार्यक्रम सन 2022-23
स्पर्धास्तर – जळगाव मनपास्तर – स्पर्धा प्रकार – सबज्युनिअर – मुले, - स्पर्धा
दिनांक 13 जुलै, 2022 – संपर्क नंबर-
अब्दुल मोहसीन सर – 83920000143 स्पर्धा
स्थळ – श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव – उपस्थिती वेळ
– स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9.00 वाजता.
ज्युनिअर
- मुले, स्पर्धा दिनांक - 14
जुलै, 2022 – संपर्क नंबर- अब्दुल
मोहसीन सर – 83920000143 स्पर्धा स्थळ
– श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव – उपस्थिती वेळ – स्पर्धेच्या
दिवशी सकाळी 9.00 वाजता.
ज्युनिअर
– मुली - स्पर्धा दिनांक - 15 जुलै,
2022 – संपर्क नंबर- अब्दुल मोहसीन सर
– 83920000143 स्पर्धा स्थळ – श्री
छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव – उपस्थिती वेळ – स्पर्धेच्या
दिवशी सकाळी 9.00वाजता.
जळगाव
जिल्हास्तर - स्पर्धा प्रकार – सबज्युनिअर
– मुले - स्पर्धा दिनांक 16 जुलै,
2022 – संपर्क नंबर- एम.के.पाटील –
8830821414, स्पर्धा स्थळ – श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा
क्रीडा संकुल जळगाव – उपस्थिती वेळ – स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9.00 वाजता
– ज्युनिअर – मुले, - स्पर्धा
दिनांक 17 जुलै, 2022 – संपर्क नंबर-
एम.के.पाटील – 8830821414, स्पर्धा स्थळ
– श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव – उपस्थिती वेळ –
स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9.00 वाजता
ज्युनिअर
– मुली - स्पर्धा दिनांक - 18
जुलै, 2022 – संपर्क नंबर-
एम.के.पाटील – 8830821414, स्पर्धा स्थळ
– श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव – उपस्थिती वेळ –
स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9.00 वाजता
तरी सदर स्पर्धेत वरील
कार्यक्रमानुसार सहभागी होवून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघानी त्यांचे प्रवेश
अर्ज व त्यासोबत खेळाडूंचा जन्मतारखेचा दाखला जोडून स्पर्धेच्या दिवशी सादर करावा,
असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment