Wednesday, 29 June 2022

रुपेश उर्फ भुऱ्या अमृत माळी या मुलगा कोणाला आढळून आल्यास त्यांनी खाली दिलेल्या दुरध्वनीवर कळवावे - पोलीस उपनिरीक्षक –चोपडा- घनश्याम तांबे

       जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.29-   रुपेश उर्फ भुऱ्या अमृत माळी वय 13 वर्ष या मुलास कोणी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवुन नेल्याचे त्याची आई  कल्पना अमृत माळी यांनी पोलीस उपनिरीक्षक चोपडा शहर पोलीस ठाणे, धनश्याम तांबे यांच्याकडे दिनांक 16 जून, 2022 फिर्याद  दिली आहे.

          तरी रुपेश उर्फ भुऱ्या अमृत माळी वय 13 वर्षे 07 महिने 08 दिवस, रंगाने सावळा, उंची सुमारे 4 फुट 5 इंच, शरीराने सडपातळ, व चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे काळे साधारण, ओठ बारीक, डोक्यावर काळे मागे वळलेले केस, उजव्या हाताच्या मनगटावर ओम गोंदलेले आहे. उजव्या हातात लोखंडी स्टीलचे कडे, अंगात गुलाबी रंगाचा ठिपक्यांचा फुल बाह्याचा शर्ट व कमरेस पोपटी रंगाची नाईट पँट घातली आहे. अशा वर्णनाचा मुलगा जर कुणास आढळल्यास त्यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे दुरध्वनी क्रमांक- 02586 /220333/7774039640 या क्रमांकावर कळवावे, असे पोलीस उपनिरीक्षक चोपडा शहर पोलीस स्टेशन घनश्याम तांबे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment