जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 1 - प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना एकुण प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के व कमाल 10 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
जळगाव
जिल्ह्यासाठी भौतिक लक्षांक एकूण 299 व गट लाभार्थी लक्षांक 14 प्राप्त आहेत. या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी केंद्र
शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
त्यासाठी http://pmfme.mofpi.gov.in/ या वेबसाईटचा वापर करावा. तसेच या योजनेतंर्गत
स्वयंसहाय्यता गट/शेतकरी उत्पादन कंपनी/सहकारी संस्था, बिगर सहकारी संस्था व प्रा.
लि. कंपनी यांचा समावेश आहे. त्यासाठी बँक कर्जाशी निगडीत भांडवली खर्चापोटी 35%
अनुदान देय आहे. जळगाव जिल्ह्यासाठी कमाल अनुदान रु. 10 लाख आहे.
तसेच सामाईक पायाभुत सुविधा अंतर्गत स्वंयसहायता
गट, शेतकरी उत्पादन कंपनी, कॉ. ऑप.संस्था, सहाकारी संस्था यांचा समावेश आहे. त्यासाठी
अनुदान प्रकल्प रक्कम मर्यादा 10 कोटी असून त्यावर अनुदान 35 टक्के प्रमाणे
जास्तीत जास्त 3 कोटी अनुदान देय आहे.
तसेच अधिक माहितीसाठी
या कार्यालयामार्फत नियुक्ती करण्यात आलेल्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांना संपर्क
करुन मोफत अर्ज ऑनलाईन् पोर्टलवर सादर करावा.
अधिक
माहितीसाठी सचिन धुमाळ-९४०४४००५५५/ ८४५९३५८४३५, प्रशांत पाटील-९४०४०४८९१२, दिनेश गवळे –
९७६४९८३४२३, सागर धनाड-९४२२२८२९८२, यांचेशी संपर्क साधवा. असे जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment