जळगाव, दि.३० (जिमाका वृत्तसेवा) : - राज्यात विभागीय, जिल्हा तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाव्दारे शासकीय वसतीगृह योजना कार्यान्वित आहे.
2)विभागीय
व जिल्हास्तरावर तालुका व ग्रामीण स्तरावर
इयत्ता 8 वी पासून ते 12वी पर्यन्त ( प्री मॅट्रीक पासून ते कनिष्ठ
महाविद्यालयापर्यन्त ) शिक्षण घेणा-या नविन व जुने विद्यार्थ्यानी शासकीय वस्तीगृह
प्रवेशासाठी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोदणी
करावयाची आहे.
3) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत
एकूण 17 आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वसतीगृह कार्यरत आहे. या सर्व वसतीगृहामध्ये ऑनलाईन
प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन 2022-23 करीता प्री मॅट्रीक व कनिष्ठ
महाविद्यालयाचे प्रवेश अर्ज www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर
स्विकारण्यात येत आहे.
4)
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यानी ( नविन व जूने) महाविद्यालय प्रवेशाच्या
आधारावर विविध प्री मॅट्रीक व कनिष्ठ महाविद्यालयासाठी खालील वेळापत्रकानुसार दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत.
5)
नविन व जून्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी वरील संकेतस्थळावर दिलेल्या user
manual चे वाचन करून त्या आधारे अचूक अर्ज भरावा.
6)
विद्यार्थ्यानी सदर संकेत स्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नांदणी (registration)
करावे. नावनोंदणी नंतर प्राप्त user id passward चा उपयोग करून अर्ज भरावा. अर्ज
भरण्यासाठी नविन विद्यार्थ्यानी Hostel Addmission मधील New Addmission हा पर्याय
काळजीपुर्वक निवडावा.
7) जे विद्यार्थी सन 2021-22 या
शैक्षणिक वर्षात (जूने विद्यार्थी) प्रवेशित होते अशा विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात देखील
अर्ज भरणे आवश्यक आहे. या करीता Hostel Addmission यामध्ये Renew Hostel
Addmission हा पर्याय काळजीपुर्वक निवडून पुढील अर्ज भरावा
8)जुन्या विद्यार्थ्यानी युझरआयडी
व पासवर्ड मिळणेसाठी www.swayam.mahaonline.gov.in या वेबसाईडच्या होम पेजवर forgot passward चा वापर
करावा यामध्ये आवश्यक ती माहिती भरून पासवर्ड रिसेट करून घ्यावा.
9) वसतीगृह प्रवेश अर्ज भरण्यासाठी
विद्यार्थ्याने प्रथम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. 10)वसतीगृहासाठी
अर्ज करताना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा.मागील
वर्षी मिळालेले गुण/गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र क्रमांकासहीत. टी. सी. चालू वर्षी
प्रवेश घेतलेल्या शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड / प्रवेश पावती, आधारकार्ड, वडीलांचा (
पालकाचा) चालू वर्षाचा उत्पादनाचा दाखला, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न
खात्याचे पासबुक झेरॉक्स, वैद्यकीय दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे) विद्यार्थ्यानी
सोबत बाळगावीत.
11) याबाबत अधिक माहितीसाठी आपण प्रवेश घेवू
इच्छीत असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक सन 2022-23 आदिवासी
मुला/मुलीचे शासकीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक
इयत्ता / अभ्यासक्रम - Pre-Matric
(इयत्ता 8 वी ते 10 वी) व 2) Junior
College (इ.11 वी व 12 वी ) – अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – 28
जुलै, 2022- नविन विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे – 1 ऑगस्ट,
2022, निवड यादीनुसार विद्यार्थ्याना प्रवेश देण्याचा कालावधी दिनांक 4 ते 11 ऑगस्ट, 2022
वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्याचे सर्व अधिकार
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल जि.जळगाव यांना राहतील असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, यावल वनिता सोनवणे
यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या
पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment