Wednesday, 1 June 2022

ज्या व्यक्ती बेकायदेशीर बाळ दत्तक घेत असतील किंवा देत असतील त्यांच्यावर कादेशीर कारवाई करण्यात येईल ...जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत

        जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 1 -  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 व महाराष्ट्र राज्य बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 तसेच केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण ( Central Adoption Resource Authority – CARA) मार्गदर्शक सुचनानुसार 18 वर्षा खालील कोणतेही बाळ दत्तक घेणे व देणे आवश्यक आहे.

          परंतु काही व्यक्ती व संस्थाकडून समाजातील (विशिष्ट समाजाचा उल्लेख करुन) ज्या व्यक्तीना लहान मुल दत्तक घ्यावयाचे असतील किंवा दत्तक म्हणून दयायचे असतील  त्यांनी संपर्क करावा, असा संदेश हॉटसॲपव्दारे तसेच समाजमाध्यमांवर संबधितांच्या संपर्क क्रमांकासह प्रसारीत केला जात आहे. मात्र हा काही व्यक्तीकडून गंभीर व बेकायदेशीर प्रकार घडत असल्याने त्यांच्याशी संपर्क करुन त्यांना त्याबाबत समज देण्यात येत आहे. व आवश्यकता असल्यास त्यांच्यावर कादेशीर कारवाई देखील करण्यात येईल. परंतु कोणीही असे बेकायदेशीर बाळ दत्तक घेवू अथवा देवू नये अन्यथा त्यांच्यावर देखील कादेशीर कारवाई करण्यात येईल. बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेवून त्या बालकांची विक्री करण्याचे गंभीर प्रकार असुन त्यावर कायदयानुसार कठोर कार्यवाही केली जाईल व असा प्रकार घडत असल्याचे कुणाच्या लक्षात आल्यास संबंधितांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव – 0257 -2228828, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव -0257-2228825, 8308177811, 7249118161, 9503754007 तसेच चाईल्ड लाईन -1098 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा.

           बालकाच्या समस्येचा काही व्यक्ती व संस्था संधी म्हणून वापर करुन घेत विक्री करत असल्याचे चित्र समाज माध्यमावरील पोस्ट वरुन दिसून येत आहे. यासाठी फेसबुक, व्हास्टॲप, इंस्ट्राग्राम, टिव्टर चा वापर करुन त्यावर विविध भावनात्मक पोस्ट टाकल्या जात असून बालके दत्तक घेण्यास व देण्यास उपलब्ध आहेत. असे चित्र निर्माण केले जात आहेत. हे व्यक्ती व संस्था बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकरता येत नाही, परंतु अशा प्रकारे बालकांना परस्पर दत्तक देणे व खरेदी विक्री करणे हा कायदयानुसार गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहित्यानुसार कठोर कारवाईस पात्र राहतील. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी एका प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment