जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 8- मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाकडुन मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणुन विक्री करणाऱ्या मे. इंद्रा सिडस, अहमदाबाद यांचे साठवणुक स्थळ शिरसोली प्र.बो. ता. जि. जळगाव येथे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव अरुण श्रीराम तायडे , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, यांच्या मार्गदर्शनाने व तालुका कृषि अधिकारी शिवाजी राऊत, मंडळ कृषि अधिकारी श्रीकांत झांबरे, कृषि सहाय्यक कमलेश पाटील, कृषि सहाय्यक भरत पाटील यांच्या सहकार्याने सापळा रचुन एकुण रुपये 93750/- किमतीचे 75 एचटीबीटी कापुस बियाणे पाकीटे जप्त केली आहे.
याबाबत
मे. इंद्रा सिड कंपनी प्रतिनीधी प्रदीप बैरागी
पाचोरा व कंपनीचे मालक इंद्रवदन
संकाभाई पटेल, अहमदाबाद यांचे विरुध्द सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व पर्यावरण
(संरक्षण) अधिनियम 1986 नुसार जळगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे क्र. 426/2022 दिनांक 7 जून,
2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खरीप हंगाम 2022 मध्ये अनधिकृत
एचटीबीटी, अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये, तसेच या बियाण्यांची कोणत्याही
परिस्थीत शेतकरी बांधवांनी लागवड करु नये, अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री
करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा मोबाईल क्र. 08468909641 व दुरध्वनी
क्र. 0257-2239054 वर माहिती दयावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी
ठाकुर, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment