Wednesday, 29 June 2022

सैनिकी मुला / मुलीचे वसतीगृहात कंत्राटी चौकीदार,स्वयंपाकी,सहाय्यक अधिक्षीका, सफाई कर्मचारी पदासाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

       जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.29- जिल्ह सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे / मुलींचे वसतीगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने चौकीदार -02, स्वयंपाकी -05(पुरुष/स्९ी), सहाय्य्क अधिक्षीका-01, सफाई कर्मचारी-02 (स्त्री/पुरुष) हे पद माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत.

          माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 15 जुलै, 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव यांनी राखून ठेवले असून अधिक माहितीसाठी 0257-2241414 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                        ०००००

No comments:

Post a Comment