जळगाव.दि.30:-
परिवहन संवर्गातील सर्व वाहने तसेच ट्रेलर्स यांना केंद्रीय मोटार वाहन नियम 1989
च्या नियम 104 ते 104-डी च्या तरतुदीनुसार AIS089 व पैकी 090 मानकांची पूर्तता
करणारे मान्यताप्राप्त परावर्तक (Reflectors), रिफ्लेक्टीव्ह टेप्स (Reflective
Tapes) आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट/टेप लावणेबाबत अपर परिवहन आयुक्त,
मुंबई यांचे आदेशानुसार.
जळगाव जिल्ह्यातील
सर्व वाहन धारक, वाहन प्रतिनीधी यांनी 1 ऑगस्ट पासून उप प्रादेशिक परिवहन
कार्यालय, जळगाव येथे नवीन नोंदणी होणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहने तसेच नवीन
योग्यता प्रमाणपत्र /योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या वाहन
धारकांनी व ट्रेलर्स वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांना वर दृष्टीपथास दिसावेत तसेच
नमूद मनकांचे उत्पादने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 126 मध्ये नमूद
चाचणी संस्थांपैकी कोणत्याही एका संस्थेंद्वारे तपासणी प्रमाणपत्र (Test
Certificate) तसेच मान्यताप्राप्त परावर्तक (Refiectors), रिफ्लेक्टीव्ह टेप्स
(Reflective Tapes) हे उत्पादनाचे Continuity Of Production प्रमाणपत्र प्राप्त
असणारे व दोन्हीही प्रमाणपत्रे वैध असणे आवश्यक आहे. तसेच MIS प्रणाली मार्फत जारी
करण्यात आलेलेच लावणे अनिवार्य राहील याबाबतची नोंद घ्यावी,असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,जळगाव यांनी एका
प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले नाही.
*****
No comments:
Post a Comment