जळगाव. दि. ५- जिल्हा सैनिकी कल्याण विभागाच्या
मुलींचे वसतिगृहात आजी-माजी सैनिकांच्या
इयत्ता आठवी पासून पुढील विविध अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेत असलेल्या मुलींना माफक
शुल्क आकारून प्रवेश दिल्या जातो. त्यांची
भोजन, निवास, अन्य सेवा या बाबींकडे विशेष लक्ष दिल्या जाते. वसतिगृहात कार्यरत
कर्मचारी मुख्यत्वेकरून सैन्य सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी असल्याने
त्यांच्याकडून वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना उत्तम शिस्तीसोबतच योग्य
मार्गदर्शनही केले जाते.
सध्या सैनिकी मुलींचे वसतिगृह, जळगांव
येथे अशासकीय सहाय्यक वसतिगृह अधिक्षीका (महिला)-एक पद रिक्त आहे. संगणकीय ज्ञान
असलेल्या उमेदवारांना प्राध्यान्य दिले जाईल. तरी जिल्ह्यातील युध्द् विधवा, विधवा
तसेच आजी-माजी सैनिक पत्नी यांच्यामधील इच्छुक उमेदवारांनी अशासकीय सहाय्यक वसतिगृह
अधिक्षीका पदासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२४१४१४ या
कार्यालयीन दुरध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
जळगांव यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment