जळगाव.दि.29
:- लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत लेखा लिपीक प्रशिक्षण
दिनांक 26 ऑगस्ट ते 5 नोव्हेंबर 2019 (एकूण 50 दिवसांचे) सत्र क्रमांक 98 आयोजित करण्यात
आले असून सदर प्रशिक्षणासाठी अनुक्रमे 1 व 7 मोड्यूलप्रमाणे निश्चित केलेला
तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार
यांच्या कोषागार कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे.
सदर प्रशिक्षण सत्रासाठी
कोणत्याही इच्छुक कर्मचाऱ्यास प्रवेश देण्यात येईल. महाराष्ट्र शासन, सामान्य
प्रशासन विभागाच्या 24 जून 2015 च्या शासन
निर्णयानुसार सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे
केले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एकूण 50 दिवसांचा आहे. या 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी
प्रवेश घेणे आवश्यक आहे. तथापि पूर्णवेळ पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट मोड्युलसाठी
प्रवेश घेण्याची अनुमती कर्मचारी यांना दिली जाईल. त्या अनुषंगाने नाशिक विभागातील
नाशिक , धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील सर्व शासकीय
कार्यालयीन प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी
पाठवावे, असे आवाहन निलेश राजुरकर, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक
यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000000
No comments:
Post a Comment