जळगाव, दि. 2 - आयुक्त, क्रीडा व युवकसेवा
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय,
जळगावमार्फत क्रीडांगण विकास अनुदान सर्वसाधारण व आदिवासी उपयोजनांतर्गत स्थानिक
स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, आदिवासी विभागामार्फत व सामाजिक न्याय
विभागामार्फत चालविल्या येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक
शाळा, आश्रमशाळा, वसतीगृह, क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण
निधी, पोलीस विभाग, स्पोर्टस क्लब, ऑफीसर्स क्लब तसेच शासकीय महविद्यालये तसेच
खाजगी शैक्षणिक संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक,
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. अशा संस्था
सदर योजनेअंतर्गत अनुदान उपलब्धतेनुसार मिळू शकेल.
सदर
योजनेअंतर्गत क्रिडांगण समपातळीत करणे, 200 मी. अथवा 400 मी. धावनमार्ग तयार करणे,
क्रीडांणास भिंतींचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित
क्रिडांगण तयार करणे, प्रसाधन गृह, चेजींग
रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण
करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची
सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा, सिमेंटचा
भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर,आसन
व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा
विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर
रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे, इत्यादी बाबींसाठी अनुदान मंजूर करण्यात
येते. वरील बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठीच एक वर्षात अनुदान उपलब्धतेनुसार व
दोन हप्त्यानुसार अनुदान मंजुर करण्यात येते.
वर
उल्लेखीत प्रत्येक बाबींकरीता (प्रस्ताव एकाच बाबींकरिता करावा) बिगर आदिवासी
भागातील संस्थाकरिता अंदाजीत खर्चाच्या 75 टक्के किंवा कमाल रुपये 7 लाख आदिवासी
भागातील संस्थाकरिता अंदाजीत खर्चाच्या 90 टक्के किंवा कमाल रुपये 7 लाख तसेच
जिल्हा परिषद मार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळा व आदिवासी आयुक्तालय, नाशिक मार्फत
चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांसाठी अंदाजीत खर्चाच्या 100 टक्के किंवा
कमाल रुपये 7 लाख या पैकी जी रक्कम कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात
येईल. मात्र क्रिडा साहित्यासाठी कमाल रुपये 3 लाख अनुदान मर्यादा राहील. क्रिडा
साहित्य मागणी प्रस्तावांसाठी संस्थेकडे सदर मैदाने, हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे.
सन
2019-20 या वर्षासाठी संस्थांचे अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत असून सदर
योजनेचा लाभ, फायदा घेवू इच्छिणाऱ्या बिगर आदिवासी, आदिवासी भागात प्रकल्प
राबविणाऱ्या संस्थांनी, शाळांनी अर्जाचा विहित नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा
क्रिडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे
दि. 1 ते 20 जुलै, 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन त्याच कालावधीत
परिपूर्ण प्रस्ताव हा ऑन लाईनद्वारे jalgaonsports.in वर अपलोड करुन व अपलोड
केलेला प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे मुळ
दोन प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या
पूर्ततेसह सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
असे सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये
कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment