Wednesday, 3 July 2019

जिल्ह्यात आजपर्यंत 93.4 मिलीमीटर पावसाची नोंद वार्षिक सरासरीच्या 14.1 टक्के पाऊस पडला


·       आजपर्यंत सर्वाधिक 151.4 मिमी इतका पाऊस जामनेर तालुक्यात
·       सर्वात कमी 55.6 मिमी इतका पाऊस अमळनेर तालुक्यात
·       जिल्ह्यात एकाच दिवसात झाली  17.2 मिमी पावसाची नोंद
         जळगाव, दि. 3 - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. जिल्ह्याच्या काही भागात दररोज पडणारा पाऊस काही तालुक्यातील पेरणीला पुरक ठरत असून  काही तालुक्यातील पिकांना जीवदान मिळण्यास मदत होत आहे. बहुप्रतिक्षेनंतर जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसाने आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 93.4 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर इतके असून मागील वर्षी 3 जुर्ल, 2018 पर्यंत वार्षिक सरासरीच्या 18.6 टक्के म्हणजेच 122.7 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी फक्त 93.4 मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या फक्त 14.1 टक्के इतका पाऊस पडला आहे.
            जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक 151.4 टक्के इतका पाऊस जामनेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच 55.6 टक्के पाऊस अमळनेर तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात 3 जुलै रोजी एका दिवसात 17.2 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात तालुकानिहाय आजपर्यंत (3 जुलै, 2019) पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका - 74.3 मिलीमीटर (10.8 टक्के), जामनेर- 151.4 मि.मी., (21.0), एरंडोल- 127.5 मि.मी. (20.5), धरणगाव - 72.9 मि.मी. (11.7), भुसावळ - 82.0 मि.मी. (12.3), यावल - 85.6 मि.मी. (12.3), रावेर - 90.1 मि.मी. (13.5), मुक्ताईनगर - 131.2 मि.मी. (21.0), बोदवड - 125.6 मि.मी. (18.8), पाचोरा - 125.5 मि.मी. (16.9), चाळीसगाव - 82.1 मि.मी. (12.4), भडगाव - 65.9 मि.मी. (9.8) अंमळनेर - 55.6 मि.मी. (9.6), पारोळा - 65.2 मि.मी. (10.3), चोपडा - 65.8 मि.मी. (9.5) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 2.9 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
०००

No comments:

Post a Comment