Friday, 26 July 2019

विद्यार्थ्यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कळविलेल्या त्रुटींची त्वरित पुर्तता करावी … उपायुक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समिती


        जळगाव.दि.26, व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष मोहिम राबविण्यात येईल असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे कळविण्यात आले आहे.
        व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेत असलेल्या 2018-2019 मधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव संबंधित महाविद्यालयामार्फत समिती कार्यालयास प्राप्त झाले आहेत. मात्र ज्या विद्यार्थी अर्जदारांना समितीकडून त्रुटी कळविविल्या आहेत. आणि ज्या  विद्यार्थ्यांनी अद्यापही  त्रुटींची पुर्तता करण्यासाठी समिती कार्यालयात संपर्क साधला नाही.  त्या संबंधित विद्यार्थ्यांशी समिती कार्यालयाकडून  वारंवार संपर्क करूनही  जे अर्जदार विद्यार्थी त्रुटींची लवकर पुर्तता करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीकामी आलेले अर्ज नियमानुसार निकाली काढण्यात येतील व याला समिती जबाबदार राहणार नाही असे उपायुक्त तथा सदस्य  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        0000

No comments:

Post a Comment