जळगाव,
दि. 19:- राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून
त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार दि. 20 जुलै, 2019 रोजी सकाळी
9.30 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथून जळगाव तालुक्यातील विविध
गावांना भेटी देण्यासाठी प्रयाण. सकाळी 10 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना
भेटी व विकास कामाचा आढावा. दुपारी 1.30 वा. पाळधी ता. धरणगावकडे आगमन व राखीव.
दुपारी 3.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथून धरणगाव ग्रामीण तालुक्यातील विविध गावांना
भेटीसाठी प्रयाण. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000
No comments:
Post a Comment