जळगाव.दि.29 :- महाराष्ट्र
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा
विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या
प्राधिकरण) पुणे डी. एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सन 2019-2020 शासकीय
कोट्यातील रिक्त जागा प्रवेश ऑनलाईन विशेष फेरीद्वारे एकूण तीन फेऱ्या घेण्यात
आल्या तथापि अद्यापही शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे
भरण्यात येतील, प्रवेश प्रक्रीयेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य या
पद्धतीने प्रवेश प्रक्रीया असून विद्यार्थी www.maa.ac.in या संकेतस्थळावरून
ऑनलाईन अर्ज भरू शकतो.
प्रवेशासाठी पात्रता व
निकष असे आहेत
प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता :- इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुल्या
प्रवर्गासाठी 49.5 टक्के व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 44.5 टक्के ) गुण असणे
आवश्यक आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरणे :-
दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2019, पडताळणी केंद्रावर जाऊन मुळ प्रमाणपत्रे पडताळणी
करून घेणे व ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करून घेणे दिनांक 29 जुलै ते 3 ऑगस्ट
2019, प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे:- खुला संवर्ग रुपये -200/- मागासवर्ग
संवर्गासाठी रपये 100/- अशे आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी
अर्ज भरून मंजूर करून घेतला आहे. परंतु अद्याप प्रवेश घेतला नाही असे विद्यार्थी
प्रवेश घेवू शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे तसेच नव्याने
प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेवू इच्छितात ते विद्यार्थी देखील अर्ज भरू शकतात.
पडताळणी केंद्रावर जाऊन अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रीयेतील
समावेश होणार नाही. सदर प्रक्रीयेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधूनच
प्रवेश घ्यावयाच्या अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत:
ईमेल /लॉगीनमधून प्रिंट घेवू अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष
प्रवेश घ्यावा. यानंतर डी.एल.डी प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात
येणार नाही याची प्रवेश घेवू ईच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे
आवाहन राजेंद्र गोंधने, सहसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment