Sunday, 7 July 2019

लघु व मध्यम उद्योगांना उत्पादित वस्तु निर्यातीसाठी मार्गदर्शन व चर्चासत्र


      जळगाव दि. 7 :- महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने लघु उद्योग भारती संघटनेच्या वतीने वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईतर्फे जळगाव जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना त्यांच्या उत्पादित वस्तु विकण्याकरिता आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करण्यासाठी व आवश्यक कौशल्यांवर प्रशिक्षित करण्यासाठी बुधवार 10 जुलै, 2019 रोजी दुपारी 2.30 वाजता हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी, जळगाव येथे मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
            या चर्चासत्रात विद्यमान व इच्छुक निर्यातदारांसाठी आंतरराष्ट्रीय विपणन व गुणवत्ता प्रमाणन, निर्यात खर्च या सारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश असेल. या सत्रात महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणुक सुविधा कक्ष (मैत्री) (MAITRI) संस्थेकडून सुद्धा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
            आगामी काळात देशाच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध स्तरावर कार्य करत आहे. राज्यात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे (MSME)  जागतिक स्पर्धामत्कता वाढविण्यासाठी कौशल्याच्या विकासावर राज्यव्यापी जागरुकता मोहिमेत पुढाकार घेण्यासाठी केंद्र सरकाचा प्रमुख कार्यक्रम जागतिक व्यापार दिवस महाराष्ट्राच्या तिसऱ्या आवृत्तीचा कार्यक्रम आहे. लघु उद्योग भारती व उद्योग संस्थेद्वारे हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी व वर्ल्ड ट्रेड सेंटरचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग तज्ञ आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय विपणन धोरणाचे महत्व जाग‍तिक दर्जाचे मानदंड स्वीकारणे, परकीय व्यापार धोरण निर्यात खर्च आणि किंमत या सारख्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.
            जळगावमध्ये फार्मासिटिकल्स, इलेक्ट्रीकल्स, कृषी क्षेत्रावर आधारीत उद्योग रासायनिक उद्योग, प्लॉस्टिक उद्योग आणि इतर उत्पादन क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एमएसएमई उद्योगांना या सत्राचा चांगला लाभ मिळणार आहे.  
            या कार्यक्रमाची नोंदणी फी रुपये तीनशे ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीकरीता 9823129222/9284000508/9960431115 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.  या कार्यक्रमाचा लाभ सर्व उद्योजकांनी घ्यावा. असे आवाहन लघु उद्योग भारती संघटना, जळगाव व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी केले.
                                                                  00000

No comments:

Post a Comment