जळगाव दि. 23 :- कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद (जळगाव) येथे दि. 22 जुलै 2019 रोजी
पिकांवर किडरोग सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण
कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने तसेच सिंजेंटा इंडिया
ली यांचे सौजन्याने आयोजित करण्यात आला होते. प्रशिक्षणास प्रमुख पाहुणे म्हणून
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील हे होते. प्रशिक्षणास
कृषि विभागाचे उपविभागीय अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व मंडळ अधिकारी तर सिंजेंटा
ली, युपील, कोरटेव्हा ऍग्री सायन्स, मोन्सॅन्टो इत्यादि खाजगी कंपन्यांचे
प्रतिनीधी ही उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान कापूस पिंकावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन
या विषयावर कापूस पैदासकार कापूस संशोधन केंद्र, जळगावचे एस.एस.पाटील यांनी
मार्गदर्शन केले. मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्किक व्यवस्थापन या विषयावर
कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती, विभागीय
व्यवस्थापक सुभाष थेटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गुलाबी बोंड अळीचे
व्यवस्थापन सर्व्हेक्षण व देखभाल यांचे महत्व विषद केले.
कार्यक्रमास उपस्थित खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधींनी कापूस पिकावरील गुलाबी
बोंडअळी व मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापनासाठी राबविण्यात येत असलेल्या
विविध विस्तार कार्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
सुनिल पाटील, निलेश वानखेडे, स्वप्नील पवार यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी कावेरी राजपूत यांनी केले. तर
आभार कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी मानले.
00000
No comments:
Post a Comment